सेलू (farmer Death) : परभणी/सेलू तालुक्यातील तळतुंबा येथील एका ६८ वर्षीय शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून निधन (farmer Death) झाल्याची घटना सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान गट नंबर ६१ मध्ये घडली. या प्रकरणी सेलु पोलीस (Selu Police) ठाण्यात १४जून रोजी रात्री ११वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सेलूतील तळतुंबा येथील घटना
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील तळतुंबा येथे शुक्रवार १४ जून रोजी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात शेतकरी माणिकराव गणपतराव घुले वय ६८ वर्षे हे गट नंबर ६१ मध्ये असलेल्या बोरीच्या झाडाखाली बसले होते. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज अंगावर कोसळून त्यांचे (farmer Death) निधन झाले. या घटनेची माहिती परसराम दत्तराव घुले यांनी (Selu Police) पोलीसांना दिल्यावरून आकस्मिक मृत्यूचे नोंद करण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी (Selu Hospital) सेलु उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवार १५ जून रोजी दुपारी १२:३० वाजता तळतुंबा येथे मयत माणिकराव घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक विवाहित मुलगी ,सून ,जावई, नातू नातवंडे असा परिवार आहे. (Selu Police) पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वशिष्ठ भिसे हे पुढील तपास करत आहेत.