परभणी/ सेलू (Farmer Death) : तालुक्यातील धनेगाव येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचे सोयाबीनची काढणी करत असताना साप चावल्याने निधन झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता घडली आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी प्रमोद दत्तोपंत जीवणे वय ५५ वर्षे हे आपल्या शेत गट क्रमांक ५० मध्ये असलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करत असताना त्यांना सापाने चावा घेतला. त्यांच्यावर सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर तात्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान (Farmer Death) त्यांचे निधन झाले.
परभणी येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री अकरा वाजता धनेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सेलू पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिलेल्या खबरे वरून आकस्मिक मृत्यूची (Farmer Death) नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या निधनामुळे धनेगाव सह परिसरात हाळहाळ व्यक्त करण्यात येत आहे.