निपाणी टाकळी येथील घटना
परभणी/सेलू (farmer Death) : तालुक्यातील निपाणी टाकळी येथे गुरुवार ६ जुन रोजी दुपारी ३ वाजता शेतात रानडुकराच्या हल्ल्यात ६५ वर्षीय शेतकरी (farmer Death) जागीच मरण पावले. या घटनेची माहिती निपाणी टाकळी चे ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत शेतकऱ्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी मोतीराम रंगनाथराव गिराम वय ६५ वर्षे राहणार निपाणी टाकळी हे शेतात काम करत असताना अचानक (wild boar attack) राणडुकराने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यान त्यांचे निधन झाले. (farmer Death) घटनेची माहिती कळताच पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर ,शिवदास सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली. मोतीराम रंगनाथराव गिराम यांच्या गटन१६४ या शेतात काम करत असतांना त्यांच्यावर (wild boar attack) हल्ला झाला. या हल्यात मोतीराम गिराम हे मयत झाले आहेत. त्याच्या पश्चात एख मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान वनविभाचे परीक्षेत्र अधिकारी ऋषी चव्हाण , वनपाल बुचाले, तलाठी सौ. बेलदार यांनी भेट दिली आहे. मृत शेतकऱ्यास वन्यप्राणी हल्याचा लाभ शासन निर्णयानुसार मिळावा व कुटुंबास दिलासा मिळावा. तसेच (Forest Department) वन विभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.