परभणी/गंगाखेड (farmer Death) : तालुक्यातील महातपुरी शिवारातील शेतात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर विज कोसळून मृत्यु (farmer Death) झाल्याची घटना दि. १ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी अंदाजे तीन वाजेच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील दत्तवाडी तांडा येथील शेतकरी भगवान शिवाजी चव्हाण वय ३८ वर्ष हे दि. १ ऑगस्ट रोजी आई व पत्नीसह महातपुरी शिवारातील शेतात गेले असताना दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पाऊस येत असल्याने त्यांची आई, पत्नी घराकडे निघाले व भगवान चव्हाण हे बैलासाठी झाडाखाली थांबले असता अंगावर (farmer Death) विज कोसळून गंभीर जखमी झाले.
चुलत भाऊ साहेबराव चव्हाण, शेत शेजारी विठ्ठल राठोड आदींनी भगवान शिवाजी चव्हाण यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना घुगे, परिचारिका प्रज्ञा जोगदंड, राजेंद्र गायकवाड, भारत भदर्गे आदींनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.