कोरेगाव, चोप/ गडचिरोली (farmer Death) : देसाईगंज तालुक्यातील आज अचानक शेतकरी (farmer Death) धान कापणी करतांना मृत्यू झाला. मृत्यू कशाने उष्माघाताने (Heat stroke) की ह्रदय विकाराने प्रश्न कायम आहे. देसाईगंज तालुक्यातील अरततोंडी जुनी या गावी चंद्रपूर जिल्ह्यातील अर्हेर पिंपळगाव येथील रहिवासी चंद्रभान धांडे, वय अंदाजे 50वर्ष यांची शेती गडचिरोली जिल्ह्यातील (Desaiganj Taluka) देसाईगंज तालुक्यात अरततोंडी जुनी या गावी आहे.
स्वतः च्या शेतातील धान कापणीला मजुरानसोबत सकाळी धान कापनी चालू असतांना चंद्रभान यांचा अचानक मृत्यू झाल्याने मजुर अवाक झाले. आता तापमान जास्त असल्याने सकाळच्या वेळी धान कापनी रोजगार हमीचे कामे केल्या जात आहेत. चंद्रभानचा मृत्यू उष्माघाताने की ह्रदय विकाराने हे अजुन कळले नाही. (Heat stroke) उष्माघाताने मृत्यू झाला असेल तर, जिल्हयातील व तालुक्यातील 4 बळी ठरणार (Health Department) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार वागाने गरजेचे असुन उन्हात कामे करतांना सावध राहने गरजेचे आहे