गव्हा निपाणी शेत शिवारातील घटना
धामणगाव रेल्वे (farmer death) : तालुक्यातील गव्हा निपाणी शेत शिवारात पेरणीपुर्व मशागतीचे काम करीत असतांना पिंपळखुटा येथील (farmer death) एका साठ वर्षीय शेतकऱ्याचा सोमवारला (ता.१७) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मृत्यू (Amravati Crime) झाल्याची घटना घडली. सदर घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराने किंवा वीज पडून झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. पावसाचे आगमन झाल्याने पेरणीपूर्व मशागतीने वेग घेतला आहे. तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकरी महादेव नंदू उके (६०) हे गव्हानिपाणी शेत शिवारात पेरणीपुर्व मशागतीचे काम करीत असतांना त्यांचा मृत्यू झाला.
हृदय विकार किंवा वीज पडल्याचा अंदाज
दरम्यान परिसरात ढगाळ वातावरण होते व विजां सुद्धा कडकडत होत्या. त्यामुळे त्यांना वीज पडून किंवा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू आला आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. (farmer death) मृत्यूची घटना घडताच ते रस्त्याने जात असलेल्या नागरिकांना शेतात पडले असल्याचे दिसले. यासंदर्भात शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा प्रमुख मनोज कडू यांनी घटनास्थळी पोहोचून संबंधितांना दिली. घटनेची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीर (Amravati Police) पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा व उत्तरीय तपासणीअंती मृत्यूचे कारण समजणार त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार सोडून गेले आहे.