धामणगाव रेल्वे (farmer died) : खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करीत असताना रोटावेटर मध्ये दोन्ही पाय जाऊन एका (farmer died) शेतकऱ्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील अशोकनगर येथे शनिवारी घडली. सतीश प्रल्हाद कडू वय ५३ वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अशोकनगर नगर येथील घटना
अशोकनगर येथील शेतकरी सतीश कडू (farmer died) हे स्वतःच्या मालकीच्या सहा एकर शेतात रोटावेटरने मशागत करीत होते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असलेले रोटावेटरचे काम शेवटच्या वीस मिनिटांचे शिल्लक असताना. मशागत व्यवस्थित व्हावी म्हणून रोटावेटर वर वजन ठेवण्यासाठी दगड ठेवण्याऐवजी ऐवजी ते स्वतः बसले. या रोटावेटर मध्ये त्यांचे दोन्ही पाय गेले.रक्ताच्या थारोड्यात रोटावेटर मध्ये अडकून पडलेक्या सतीश कडू यांना उपस्थितांनी बाहेर काढले. (farmer died) अत्यावस्थेत त्यांना अमरावती येथे उपचारासाठी दाखल करीत असताना उपचारा पूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतीश यांच्यामागे पत्नी , दोन मुली आहेत व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.