Parbhani Case:- परभणीतील सेलू तालुक्यातील पिंप्रोळा येथे वीज पडून वाकी येथील शेतकऱ्याचे निधन (Death) झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली आहे.
दिपावलीच्या पूर्वसंध्येला नाईकनवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
दिपावलीच्या पूर्वसंध्येला अचानक घडलेल्या या घटनांमुळे नाईकनवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील वाकी येथील शेतकरी बाबासाहेब आप्पासाहेब नाईकनवरे हे आपल्या पिंप्रोळा परिसरात असलेल्या शेतात गेले असता गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी अचानक जोराच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पाऊस (Rain)पडला. यामध्ये दुपारी तीन ते चार दरम्यान बाबासाहेब नाईकनवरे यांच्या अंगावर विज पडून त्यांचे निधन झाले. घटनेची माहिती पोलीसांना कळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ट भिसे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे शव (Dead body)उत्तरीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात(hospital) आणण्यात आले.आज दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. बाबासाहेब नाईकनवरे यांच्या पार्थिवावर वाकी येथे शुक्रवार १नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत बाबासाहेब नाईकनवरे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं, सुना, मुलगी, जावई असा परिवार आहे. दिपावलीच्या सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे वाकी सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची सेलु पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.