Parbhani :- परभणीतील पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळगाव शिवारातील गट क्रमांक १६९ मधील शेतातुन जाण्या – येण्यासाठी रस्ता दिला नाही म्हणून आखाड्यात झोपलेल्या शेतकर्याच्या पोटात चाकुने (knife) वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून मयताच्या मुलाने पळ काढल्याने तो बालाबाल वाचला आहे. हा सर्व प्रकार एखाद्या चित्रपटात घडावा असा झाला असुन या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
दोन महिला गंभीर जखमी; दोन आरोपींना पोलिसांनी केले अटक
याबाबत अधिक माहिती अशी की, ताडकळस पोलिस ठाण्यात चंद्रकांत विलास शिंदे यांनी फिर्याद दिली की, कळगाव शिवारातील गट क्रमांक १६९ या शेतातील आखाड्यावर शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास शेतातुन रस्ता दिला नाही म्हणून आरोपी कुबेर दादाराव माने रा. कळगाव व कैलास ऊर्फ बाळु साहेबराव होनमणे रा.ताडकळस यांना मनात राग धरून त्यांचे वडील विलास उत्तमराव शिंदे वय ५० वर्षे यांनी शेतातील आखाड्यावर जाऊन त्याच्या पोटात डाव्या बाजूला चाकुने वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर आखाड्यावर असलेल्या शिंदुबाई विलास शिंदे व जयश्री चंद्रकांत शिंदे या दोघींना गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच सपोनि गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच लगेच दोन्ही आरोपींना अटक केली.