मारवाडी रेंज मधील जनुना शेतशिवारातील घटना
पुसद (Leopard attack) : मारवाडी रेंज मधील जनुना शेतशिवारात एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना 12 नोव्हेंबर च्या चार वाजता दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, शेतकरी धोंडू खेता राठोड हे आज दुपारी आपल्या शेतातील कामे उरकून चार वाजता दरम्यान घरी परत येत असताना अचानक बिबट्या व ते समोरासमोर आले. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला शेतकरी धोंडू राठोड च्या मांडीला व पोटाला जाती रुतली तर बिबट्याने त्या शेतकऱ्याच्या पाठीवर पंजाने हल्ला चढविला त्यांच्या पाठीवर जखमा उमटल्या त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने (Leopard attack) बिबट्याने तिथून पळ काढला.
शेतकरी धोंडू खेता राठोड त्यांच्यावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात रेफर केले. सध्या शेतामध्ये शेतीची लगीन घाई सुरू असून निवडणुकांचा माहौल असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळेनात तर उमेदवारांच्या प्रचारामध्ये रॅल्या मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची पुरुषांची गर्दी केल्या जात असल्यामुळे व शेता पेक्षा जास्त मजुरी मिळत असल्यामुळे शेतात मजूर काम करायला जायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची कामे स्वतः शेतात जाऊन करावी लागत आहे. हे विशेष.