हिंगोली(Hingoli):- शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणी करीता हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण (Fasting to death) सुरू केले आहे. काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. उपोषण करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने उपोषणाच्या चौथ्या दिवशी 27 जूनला शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी(Sloganism) केली. याचवेळी शांताराम सावके या युवा शेतकऱ्याने शासन कर्जमाफी (loan waiver) जाहीर करीत नसल्याच्या निषेधार्थ आपल्याकडील मोटरसायकल पेटवून निषेध (Prohibition) नोंदविला.