विषारी द्रव प्राशन केले, परभणीतील सोनपेठ पोलीसात नोंद
सोनपेठ (Farmer suicide) : पाऊस जास्त झाल्याने नापिकी, बियाणांचा खर्च आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत एका ४० वर्षीय शेतकर्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गंगाखेड तालुक्यातील भांबरवाडी येथे २६ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या (Farmer suicide) प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
लिंबाजी राम भांबरे वय ४० वर्ष रा. भांबरवाडी ता.गंगाखेड असे मयताचे नाव आहे. या बाबत गोिंवद भांबरे यांनी खबर दिली आहे. लिंबाजी भांबरे यांनी शेतातील पिकात पाऊस जास्त झाल्याने नापिकी झाली. बियाणांचा खर्च कसा निघेल, बँकेचे कर्ज कसे फेडू याचा ताण आल्याने कापूस फवारणीसाठी आणलेले विषारी द्रव प्राशन करून (Farmer suicide) आत्महत्या केली. प्रकरणाचा तपास पोह बाजगीर करत आहेत.
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
परभणी/सेलू : तालुक्यातील रवळगाव येथील ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी पत्राच्या लोखंडी आडुला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. रमेश दिनकरराव ढोके या तरुणाने घरातील सर्वजण पित्र जेवण्यासाठी गेले असता मद्यपी अवस्थेत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच बीट जमादार ज्ञानेश्वर जाणगर, पोह शिवदास सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणला. डॉ.संजय लोया यांनी शवविच्छेदन केले. दिनकर ढोके यांच्या खबरीवरून सेलू पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोनि दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह शिवदास सुर्यवंशी तपास करत आहेत.