हिंगोली (farmer suicide) : हिंगोली ते पूर्णा रेल्वे मार्गावर वसई शिवारात अल्पभूधारक शेतकऱ्याने – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या कारणातून बुधवारी पहाटेच्या सुमारास मालगाडीसमोर उडी मारून (farmer suicide) आत्महत्या केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसई शिवारात गंगाधर लक्ष्मण सातपुते (३५)या युवकाचा मृत्यू (farmer suicide) झाला. त्यांना दिड एकर शेती असुन ते रोजमजूरी व दुग्ध व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. यंदा त्यांनी दिड एकरमध्ये सोयाबीन पिक घेतले. त्याला शेंगा लागण्याच्या अवस्थेत १ व २ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून सोयाबीन पीक पिवळे पडले.
त्यामुळे हे पीक हातचे गेल्याने आता लागवडीचा खर्च कसा निघेल व उदरनिर्वाह कसा चालवावा या चिंतेतून ते ११ सप्टेंबर रोजी पहाटे शेतात जातो म्हणून घरातून बाहेर पडले. पहाटे ५.३० च्या सुमारास शेतालगत असलेल्या रेल्वे रूळाजवळ बसले आणि मालगाडी येताच गंगाधर सातपुते यांनी मालगाडीसमोर उडी मारून (farmer suicide) आत्महत्या केली. या घटनेची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक जी. एस. राहीरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दस यांच्या पथकाने भेट दिली. सुरू घटनेबाबत औंढा नागनाथ पोलिसात (Aundha Nagnath Police) आकस्मात मृत्यूची नोंद झाली नव्हती.