विदारक परिस्थितीचा विचार शासनकर्ते कधी करणार?
शेतातील सोयाबीन काढणीलाही परवडेना,नुकसानग्रस्तांना शासनाच्या मदतीची प्रतिक्षा कायम
यवतमाळ (Farmer Suicide Case) : यंदाच्या दिवाळीत शेतकर्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रशासनाने अद्यापही शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही. काही ठिकाणी नुकसान भरपाई जमा झाली मात्र बहुतांश शेतकर्यांना दिवाळीच्या दिवसात प्रतिक्षा करावी लागत आहे. (Farmer Suicide Case) कापुस गेले सोयाबीन गेले शेतकर्यांच्या घरी कसली दिवाळी साजरी करायची असा प्रश्न पडला आहे.त्यामुळे आर्थिक व भावनि क विवंचनेतून हतलबतेने शेतकरी स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळत आहेत.
दिवाळीच्या तोंडावर आज धनोत्रयोदशीच्या दिवशी कळंब तालुक्यातील तिरझडा येथील सुभाष वसंतराव ठूसे तर दारव्हा तालुक्यातील लोही येथील नितीन चव्हाण या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्या मन हेलावून टाकणार्या आहेत. तेव्हा शेतकर्यांवर ओढवलेल्या विदारक परिस्थितीचा विचार शासन व शासनकर्ते करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले,नदी काठावरील शेती पूर्णत: वाहून गेल्या त्यांच्याकडे तर उत्पन्नाचे साधन राहिले नाही.५० टक्के पेक्षा अधिकच्या पिकांचे नुकसान झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. आणि ज्यांची पिक काही प्रमाणात बचावली,मात्र ढगाळ वातावरण व रोगराईमुळे त्यांच्या पिकांचे उत्पादन घटले आहे,त्यांचावरही आर्थिक संकट कायम आहे.
बाजारात सोयाबीनचे दर तीन ते साडेतीन हजाराच्या वर नाहीत,अजूनही शासनाने हमीदाराने सोयाबीनची खरेदी सुरु केलेली नाही.त्यामुळे दिवाळीच्या दिवसात खुल्या बाजारात सोयाबीन विकणार्या शेतकर्यांना १५०० ते १८०० रूपयांपर्यंतचे क्विंटली नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात सोयाबीन काढायचे म्हटले तर सोयाबीन सोंगणीचा मजुरी खर्च ही निघत नाही तर कापसाच्या झाडांना दोन,चार बोंडे लागली आहे. कापसाचे उत्पादन होणार नसल्याचे वास्तव आहे. त्यात शासनाकडून दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती मात्र अजूनही बहुतांश शेतकर्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झालेली नाही.
शासनाकडून घोषीत करण्यात आलेल्या शेतकर्यांसाठीच्या विशेष पॅकेज अजूनही शेतकर्यांपर्यंत पोहचलेले नाही. त्यामुळे खरीप हंगामाचे हाती येणारे पिक अल्पभूधारक व उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसणार्या शेतकर्यांसाठी भिषण प्रश्न बनला आहे. (Farmer Suicide Case) दिवाळी सारख्या सणात धनोत्रयोदशीच्या दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद सण साजरा करण्याऐवजी जर जिल्हातील दोन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतील तर शेतकर्यांची स्थिती किती बिकट झाली असेल ,याचा विचार शासनकर्ते करणार नाहीत का?