परभणीच्या मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार येथील घटना
आकस्मात मृत्यूची नोंद
परभणी/मानवत (Farmer suicide Case) : सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ जानेवारी रोजी सकाळी ७ च्या सुमारास मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार येथे उघडकीस आली. या (Farmer suicide Case) प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रल्हाद पंढरीनाथ आवचार वय ४९ वर्षे असे मयताचे नाव आहे. या बाबत एकनाथ भानुदास आवचार यांनी खबर दिली आहे. प्रल्हाद आवचार हे बँकेचे कर्ज व शेतीत होत असलेली नापिकी या विवंचनेत होते. यातच त्यांनी राहत्या घरात पत्रास लावलेल्या लाकडी आडुला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Farmer suicide Case) घटनेची माहिती मानवत पोलीसांना देण्यात आली. सपोनि संदिप बोरकर, पोउपनि नागनाथ पाटील, पोना. इंगळे, खंदारे यांनी घटनास्थळी भेट दिली. मानवत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि नागनाथ पाटील करत आहेत.