वसमत तालुक्यातील गुंडा येथील घटना
हिंगोली (Farmer suicide Case) : शेतातील नापिकी व बँकेचे घेतलेले ६ लाख ६० हजार रूपयाचे कर्ज कसे फेडावे त्यातच सोयाबीन व कापसाला चांगला दर मिळत नसल्याने वसमत तालुक्यातील गुंडा येथील ५० वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून (Farmer suicide Case) आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.
सोयाबीन व कापसाला भाव मिळत नसल्याने आखाड्यावर प्राशन केले विषारी औषध
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील गुंडा येथील ज्ञानोबा मारोतराव भालेराव (५०) यांना चार ते पाच एकर कोरडवाहू शेती आहे. याच शेतीवर आपल्या कुटुंबियाची उपजिवीका भागवत होते. त्यांनी त्यांना दोन मुले, दोन मुली, पत्नी, आई, बहीण असा परीवार आहे. यामध्ये त्यांचा एक मुलगा बी.ए.एल.एल.बी. व दुसरा मुलगा अॅग्रीचे शिक्षण घेत आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये नापिकी झाली. उरले, सुरले सोयाबीन व कापसाला चांगला दर मिळेनासा झाला.
शेतीसाठी त्यांनी ६ लाख ६० हजार रूपयाचे बँकेचे कर्ज घेतले होते. त्यामुळे (Farmer suicide Case) एकीकडे शेतातील नापिकी तर दुसरीकडे बँकेचे कर्ज कसे फेडावे अशी चिंता त्यांना भेडसावत होती. ज्ञानोबा भालेराव हे नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेले असताना त्यांनी आखाड्यावर विषारी औषध पिल्ल्याने त्यांना तात्काळ परभणी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ४ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत गजानन भालेराव यांनी हट्टा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जी.केद्रे करीत आहेत.