नातेवाईकांचा व गावकऱ्यांचा दिवसभर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
कळमनुरी/हिंगोली (farmer suicide case) : कळमनुरी तालुक्यातील सुकळी वळण येथील २८ वर्षीय शेतकऱ्याने शेतीच्या कारणावरून तहसील कार्यालयातील अधिकारी व सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यासह दोघांनी अन्याय करून वेळोवेळी त्रास देत असलेल्या त्रासाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवित असल्याचा मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ जुलैच्या सकाळी ६ वाजेच्या घडली आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने केलेल्या व्हिडिओमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नसल्याची भुमिका नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी घेऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला परंतु याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
याबाबत अधिक माहिती अशी की सुकळी वळण येथील चंद्रवंशी कुटुंबाची ईसापुर धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे संपादित झालेल्या जमिनीचे बनावट स्टॅम्प पेपर तयार करून हक्क सोड पत्र खोटे व बनावटी बनवून हक्क सोड पत्राचा फायदा घेऊन चंद्रवंशी कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर चंद्रवंशी कुटुंबीयाने न्यायासाठी उपोषण केले होते परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही तसेच सतत त्यांना त्रास देण्याचे काम सुरू होते या त्रासाला कंटाळून दि.२९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास कृष्णा अंबादास चंद्रवंशी यांनी त्यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला याचा आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवून आत्महत्या केल्याची घटना घडली यानंतर संतप्त नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी कृष्णा चंद्रवंशी यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून पोलीस ठाण्यासमोर येऊन ज्यांचे व्हिडिओमध्ये नावे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी करून शव विच्छेदन थांबविले व पोलीस ठाण्याबाहेर दिवसभर ठिय्या मांडला परंतु पोलीस प्रशासनाने उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान या प्रकरणी सर्व कागदपत्रांची चौकशी व तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिली.यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे हे उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी यांनी सर्वांना गाळपेरा मंजूर केला आहे. प्रकरण मोजणीच्या स्तरावर प्रलंबित आहे. तसेच न्यायालयाचा स्थगिती आदेश असुन अर्जदारांनी मोजणीची फीस भरली नाही अशी माहिती तहसीलदार सुरेखा नांदे यांनी दिली.