२ प्रकरणे फेरचौकशीत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
अकोला (Farmer suicide Case) : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ठेवण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्येच्या २० प्रकरणांपैकी ५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. २ प्रकरणे फेरचौकशीत तर उर्वरीत निकषात न बसणाऱ्या १३ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. सोमवार, ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ५ प्रकरणांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मदतीसाठी पात्र (Farmer suicide Case) शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सततची नापिकी, सावकार किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज, उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्च अधिक व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील (Farmer suicide Case) शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून एका लाखाची मदत देण्यात येते. संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रकरण निश्चित करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत एकूण २० प्रकरण ठेवण्यात आले. त्यापैकी ५ प्रकरण मदतीसाठी पात्र करण्यात आले, १३ अपात्र ठरले तर २ प्रकरणाची फेरचौकशी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समितीचे सदस्य उपस्थित होते.
अशी आहेत पात्र प्रकरणे
बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत एकूण २० प्रकरण (Farmer suicide Case) ठेवण्यात आले. त्यापैकी ५ प्रकरण मदतीसाठी पात्र करण्यात आले, १३ अपात्र ठरले तर २ प्रकरणाची फेरचौकशी करण्यात येणार आहे. (Farmer suicide Case) जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समितीचे सदस्य उपस्थित होते. सुभाष सोनटक्के (५७) वाडेगाव ता. बाळापूर), अमर दहिभात (२९) बळेगाव ता. अकोट), संदीप गोपनारायण (३०) घुसर ता. अकोला), सुधाकर गवारगुरू (४२) सागद ता. बाळापूर), शिवदास ताथोड (४४) कसूरा ता. बाळापूर).