औसा (Farmer suicide Case) : औसा तालुक्यातील शिवली येथे शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. औसा तालुक्यातील शिवली गावात बुधवारी (दि. 11) सकाळी आठ ते नऊ च्या दरम्यान मोतीराम माणिक भारती (वय 40) हा शेतकरी घरुन स्वतःच्या शेताकडे गेला. शेतात जाऊन त्याने शेतातील लिंबाच्या झाडास कुळवाच्या एटणाने (दोरखंड) गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. Farmer suicide Case) घटनास्थळी भादा पोलीस ठाण्याकडून पोलीस पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांना विचारले असता गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.