अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान
कर्ज कसे फेडावे या विवंचनेत टोकाचे पाऊल
परभणी (Farmer Suicide Case) : अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान, सततची नापिकी या विवंचनेत एका तरुण शेतकर्याने विषारी द्रव प्राशन केले. उपचारा दरम्यान शेतकर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी १४ डिसेंबरला परभणी ग्रामीण पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण उत्तम भालेराव यांनी खबर दिली आहे. विठ्ठल राम भालेराव (वय १९ वर्ष, रा. कुंभारी) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. विठ्ठल भालेराव हा आजोबा व चुलते यांच्या नावे असलेली शेती वहिती करत होता.
अतिवृष्टीने झालेले शेतीचे नुकसान आणि नापिकी यामुळे शेतीवर घेतलेले बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत विठ्ठलने (Farmer Suicide Case) विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सदर शेतकर्याचा मृत्यू झाला. परभणी ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास पोउपनि. गडदे करत आहेत.
बेशुध्द पडलेल्या इसमाचा मृत्यू
परभणी : तालुक्यातील सिंगणापुर ते ताडकळस रोडवर असलेल्या एका ओढ्याजवळ बेशुध्द होऊन पडलेल्या इसमाला उपचारासाठी परभणीतील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र सदर इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी १४ डिसेंबरला दैठणा पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुपेश कांबळे यांनी खबर दिली असून बंडू कांबळे (वय ४८ वर्ष) असे मयताचे नाव आहे. सपोउपनि. फड तपास करत आहेत.