गर्रा/बघेडा (Farmer Suicide Case) : तुमसर तालुक्यातील आलेसूर येथील एका कर्जबाजारी शेतकर्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटना दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. कन्हैय्या माधोराव कोहळे (५०) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
जंगलव्याप्त व आदिवासी बहुल असलेल्या आलेसूर येथील कन्हैय्या कोहळे हा दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी घरी कुणालाही न सांगता निघून गेला होता. रात्र होऊनही सदर शेतकरी घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दि.३ ऑगस्ट रोजी गावातील बंडू राऊत नामक शेतकर्याच्या विहिरीत कन्हैय्या कोहळे याचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. (Farmer Suicide Case) मृतक शेतकर्यांवर कर्ज असल्याचे त्याचे कुटुंबियांकडून सांगितले जात आहे.
कर्ज कसे फेडायचे?
या मानसिकतेत सापडला होता. काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेऊन (Farmer Suicide Case) आत्महत्या केली. घटनेची माहिती पो.पा.घोडीचोर यांनी गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पो.नि.शरद शेवाळे यांचे मार्गदर्शनात पो.हवा.बांते, तुषार कांबळे करीत आहेत.




