कळमनुरी/हिंगोली (farmer suicide case) : कळमनुरी तालुक्यातील सुकळी वळण येथील एका २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्या (farmer suicide) प्रकरणात सोमवारी २९ जुलै रोजी तब्बल सात तासांच्या चर्चेनंतर तोडगा निघाला. या प्रकरणी तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांसह तिघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ठिय्या मांडून बसलेल्या गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून निघून गेले.
कळमनुरी तालुक्यातील सुकळी वळण येथील चंद्रवंशी कुटुंबाची जमीन इसापूर धरणासाठी संपादीत करण्यात आली होती. सदर जमीन गाळपेऱ्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रवंशी कुटुंबियांनी केली होती. सन २००९ पासून चंद्रवंशी कुटुबियांनी प्रशासनाचे उंबरठे झिजविले मात्र त्यांच्या अर्जाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यानंतर सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्याने जमीन त्यांच्या नावांवर करून घेतल्याचा आरोप कृष्णा अंबादास चंद्रवंशी (२८) यांनी केला.
या प्रकरणात महसूलचे वरिष्ठ अधिकारी तसेच सेवानिवृत्त मंडळ अधिकारी व अन्य काही जण जबाबदार असल्याचा आरोप करणारा व्हिडीओ कृष्णा यांनी स्वतःच्या शेतात जाऊन तयार केला. त्यानंतर शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शेतात जाऊन मयत कृष्णा यांचा (farmer suicide) मृतदेह कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी केलेल्या व्हिडीओ मध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून कळमनुरी पोलिस ठाण्या समोर गावकऱ्यांनी ठिय्या मांडला.
दरम्यान, दुपारी तीन वाजल्यापासून पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक सतीष ठेंगे यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनीही पोलिस ठाण्यात येऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मात्र जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही अशी भुमीका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यानंतर रात्री दहा वाजता तोडगा निघाला.रात्री 11 वाजता शवविच्छेदन करून सकाळी 2 वाजण्याच्या सुमारास सुकळी वळण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
या प्रकरणी देवानंद चंद्रवंशी यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी सेवानिवृत्त मंडळ अधिकारी शेषराव पवार, महेश शेषराव पवार व विमालबाई शेषराव पवार गाळपेऱ्याची जमीन मिळू दिली नाही तसेच ते कृष्णा यांना मानसीक त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून कृष्णा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक एस. पी. इंगळे पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून निघून गेले
दहा तासानंतर मयताचे शवविच्छेदन
29 जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मयतानी आत्महत्या केली याची माहिती मिळतात कळमनुरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले सह इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचून घटनेच्या पंचनामा करून मयतावर शवविच्छेदना साठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले परंतु संतपत नातेवाईक जोपर्यंत मोबाईल चे व्हिडिओ मध्ये मयाताने चार लोकांचे नाव सांगितले असून या चौघांविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शव विच्छेदन करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली परंतु संतापत नातेवाईकाने व गावकऱ्यांनी घेतली. यामुळे पोलीस प्रशासन चांगलाच अडचणीत आला होता.
यानंतर उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस विभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षकांनी समजून्याच्या प्रयत्न केले पोलीस प्रशासन तिघा विरोध गुन्हा दाखल करणार असे सांगितले परंतु तहसील अधिकारी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही त्यांची चौकशी करू असे सांगितले परंतु कोणीही ऐकण्याचे मनस्थितीत ना होते सर्वांची स्टाईल कामात आली व तहसील अधिकारी वगळता तीन लोकाविरोध गुन्हा दाखल झाला करण्यात आला यानंतर चक रात्री बारा वाजता शववीच्छेदन करण्यात आले मयतावर त्यांचे राहते गावी रात्री दोन वाजता (farmer suicide) अंत्यसंस्कार करण्यात आले