पुसद (farmer Suicide) : येथील बस स्थानक परिसरातील (LifeLine Hospital) लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आय सीयु च्या एका बेडवर एक शेतकरी मृत्यूची विष पिऊन झुंज देत आहे.! त्या शेतकऱ्याला संबंधित एका बँकेच्या व सोसायटीच्या शाखेने शेतीसाठी पीक कर्ज नाकारल्यामुळे (social media) सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल करून त्या (farmer suicide) शेतकऱ्याने विष प्राशन केले. संबंधिताच्या नातेवाईकांनी तातडीने त्या व्यक्तीला पुसद येथील (LifeLine Hospital) लाईफ लाईन हॉस्पिटल येथे दाखल केले. त्या शेतकऱ्यावर आयसीयूच्या बेडवर उपचार सुरू आहेत.
या राज्यकर्त्यांसाठी श्रमेची बाब
दैनिक देशोन्नतीच्या प्रतिनिधीने संबंधितांवर उपचार करणारे डॉ. प्रकाश राठोड यांच्याशी प्रत्यक्षात संपर्क साधून बोलणं केले असता, तो व्यक्ती उपचाराला प्रतिसाद देत असल्याची त्यांनी सांगितले आहे. असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. अर्थातच पीक कर्जासाठी (farmer suicide) शेतकऱ्यांना विषयाचा प्रयोग करावा लागत असेल तर, या राज्यकर्त्यांसाठी श्रमेची बाब आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार सातत्याने शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरण अवलंबून जगाच्या पोशिंदाला वेठीस धरत आहे. तर हे सरकार केवळ उद्योगपतींचे धार्जिने झालेले दिसत आहेत, हे विशेष.