मेरा बु (farmer Suicide) : येथील ६५ वर्षीय वयोवृध्द शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेतातील झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने (farmer suicide) गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान गावालगत काही अंतरावर उघडकीस आली.
मेरा बु येथे घडली दुःखद घटना
अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera Police) अंतर्गत येणाऱ्या मेरा बु येथील शंकर झुंगाजी डोंगरदिवे याच्याकडे गावालगत भाग २ मध्ये गट न. २१०,२१३ मध्ये ०.५९ व ०.३० आर अशी एकूण सामूहिक अडीच एकर कोरडवाहू शेती आहे .कमी शेती असल्याने ते त्यांच्या मुला बाळा सह शेतातच राहून शेती करत होते. त्यांनी शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून ५५ हजार तसेच ग्रामीण कुटा बँक कडून कर्ज घेतले होते, अशी माहिती (farmer suicide) मृतकाचे नातेवाईक पप्पू आराख आणि श्रीकांत राऊत यानी दिली. त्यामुळे एकंदरीत दोन ते तीन लाख रुपये कर्जाचा बोजा असल्यामुळे ते विवंचनेत होते. सतत होत असलेली नापिकी आणि बँका व खासगी वित्तीय संस्थांचे कर्ज कसे फेडायचे, घर कसे चालवायचे हे प्रश्न त्यांना सतावत होता.
या विवंचनेतच शंकर डोंगरदिवे यांनी सकाळी शौचालयास जातो म्हणून घरून गेले आणि स्वत: च्या शेता शेजारील अशोक नारायण पडघान यांच्या शेतातील रामफळ या झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या (farmer suicide) केल्याचे. हा प्रकार विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या लोकांनी पाहिला असता लगेच गावाचे कोतवाल सचिन पडघान व पोलीस पाटील बद्रिप्रसाद पडघान यांना कळविले त्यामुळे त्यांनी अंढेरा पोलीस स्टेशन ला जावून लेखी स्वरुपात माहिती दिली. या (farmer suicide) माहितीवरून (Andhera Police) ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देढे व वायाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला. शंकर डोंगरदिवे यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी तसेच सहा बहिनी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. शंकर डोंगरदिवे यांनी एकाकी मृत्यूला जवळ केल्याने संपूर्ण मेरा बु गावात हळहळ व्यक्त होत आहे.