पुसद (Farmer suicide) : पुसद येथील लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी (Life Line Hospital) हॉस्पिटलमध्ये आयसीयु च्या मध्ये “त्या ” शेतकऱ्याची मृत्यूची झुंज (farmer suicide) अजूनही सुरूच आहे. प्राप्त माहितीनुसार,पुसद तालुक्यातील उल्हासवाडी पोस्ट लोहरा येथील रहिवासी शेतकरी बापूराव हौसाजी दांडेगावकर यांनी बँकेच्या मॅनेजरच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) करून शेतात विष प्राशन केल्याची घटना घडली होती.
येथे CLICK करा: कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्याची विष पिऊन मृत्यूची झुंज!
शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
त्यानंतर त्यांना दि. 31मे रोजी रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉस्पिटलला भरती केले होते. त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या सामायिक गोपवाडी शिवारात व लगतच्या अनसिंग शिवारात शेती आहे. त्या शेतीच्या पीक कर्जासाठी वारंवार बँकेच्या व सोसायटीच्या चकरा माराव्या लागत असल्यामुळे त्या बाबीला त्रस्त होऊन त्या (farmer suicide) शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले होते. त्या शेतकऱ्यावर लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Life Line Hospital) उपचार सुरू आहेत. मात्र तो अजूनही बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्याचे समजते. त्यांना दोन मुले एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. श्रीरामपूर येथील वायडीसीच्या शाखेकडे त्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केला होता.
बँकेने कर्ज नाकारल्यामुळे सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल
जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी बँकांच्या प्रमुखांची मॅनेजरची बैठक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. व आपणाला दिलेल्या उद्दिष्टाची कृती करावी असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. पुसद तालुक्यातील पीक कर्जासाठी वारंवार चकरा मारणाऱ्या (farmer suicide) शेतकऱ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. याकडे सर्व संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत याची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. तर शेतकऱ्यांनीही संयम बाळगणे गरजेचे आहे. असे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नव्हे. आपल्या कुटुंबाचा परिवाराचा विचार करून कोणताही निर्णय घेणे गरजेचे आहे हे विशेष.