विषारी द्रव केले प्राषन
परभणीतील सेलू पोलिस ठाण्यात नोंद
परभणी (Farmer suicide) : बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत नैराश्यात राहुन फवारणीचे विषारी द्रव प्राषन केलेल्या एका तरुण शेतकर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी १८ डिसेंबरला सेलू पोलिस ठाण्यात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोविंद जाधव यांनी खबर दिली आहे. गणेश सुंदरराव जाधव (वय ३४ वर्ष, रा. म्हाळसापुर ता. सेलू) असे मयताचे नाव आहे. मयतावर एसबीआय बँकेचे पीक कर्ज, आयसीआयसीआय बँकेचे गोल्ड कर्ज, तुळजाभवानी बँकेचे गोल्ड कर्ज होते. या कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेत राहत नैराश्यातुन त्यांनी फवारणीचे (Farmer suicide) विषारी द्रव प्राषन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. तपास पो.ह. सुर्यवंशी करत आहेत.