सावली (Heavy rain) : वेळेवर पाऊस (Heavy rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी, पावसाने मारलेल्या दाड़ीमुळे सारेच अंदाज खोटे ठरल्याचे दिसुन येत आहे. पाऊस लांबणीवर गेला, त्यांचा परिणाम यंदाच्या चालू खरीप हंगामावर बसला असून, शेती हंगाम पुढे गेल्याची खंत शेतक़री राजा वर्तवीत आहे. पावसाच्या उशिरा आगमनाने धानपिकाची पेरणी खोळबली असून, खरीप हंगाम पेरणीविना समोर गेल्याचे दिसुन येत आहे.
आद्राकडून पावसाची अपेक्षा
परिणामी पावसाची (Heavy rain) प्रतीक्षा करणारा शेतकरी आता कोणतीही पर्वा न करता धान पिकाच्या पेरणीला सुरुवात केल्याचे दिसुन येत आहे. हंगाम पूर्व मशागत करून, शेतकारी राजा पावसाच्या प्रतिक्षेत असताना रोहिणीनंतर लागलेल्या मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होईल, असी अपेक्षा होती. मात्र रोहिणी पाठोपाठ लगलेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीचे मोठे संकट शेतकऱ्या समोर निर्माण झाल्याने मृगनंतर लागणाऱ्या आद्रा नक्षत्राकडुन दमदार पावसाची अपेक्षा केली जात आहे.
यंदा ख़रीपात रोवनी पेक्षा आवत्या वर भर
धानपिकाच्या उत्पादनासाठी सदा अग्रेसर असलेल्या तालुक्यात सिंचनाची मोठी सोय नाही. ब्रिटिश आसोलामेंढा तलाव त्यानंतर लहान मोठे खाजगी गावठी तलाव, लिप्ट ऐरीकिशन आदिच्या भरोशावर तालुक्यात धान उत्पादन केले जायचे. आता तेही निसर्गाच्या भरोशावर अवलंबून असल्याने नेहमीच या भागात सिंचनाची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याना सिंचनाची मोठी सुविधा निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय प्रकल्प गोसे अंतर्गत आसोलामेंढा तलावाच्या नूतनीकरणातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहचावे, अशी व्यवस्था निर्माण होत आहे. त्यासाठी मुख्य नहराच्या दुथळी सिमेंट काँक्रेट, लघु कालवे बंद करुण भूमिगत जलवाहीनी मार्फत पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाण्याचा अपवय न होता पोहचविले जाणार असून, या भागात बारमाही पाण्याची सोय करून, हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचा पर्यत्न केला जात आहे.
परंतु वेळेवर पेरणी योग्य पाऊस (Heavy rain) न झाल्याने निर्माण होत असलेल्या सिंचन व्यवस्थेचा फायदा होत आहे. धानपिक पेरणी हंगामा दरम्यान झाली असती तर, पिकच्या पुढील कार्याला नेहमी प्रमाणे गोसे अंतर्गत आसोलामेंढा तलावाचे पाणी कामी आले असते. परंतु जिथे पेरणी खोळबली, तिथे पेरणीसाठी आसोलामेंढा तलावाचे पाणी सोडल्या शिवाय पर्याय राहणार नाही. मात्र पावसाची कोणतीही पर्वा न करता पावसाविना समोर गेलेल्या यंदाच्या खरीप हंगामाची समस्या लक्ष्यात घेता शेतक ऱ्यनी धान पिकाच्या पेरणीचा धडाका सुरु केला आहे. तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी पेरनीयोग्य २८ हजार ४५६ हेक्टर क्षेत्र ख़रीपाचे असून, संबंध क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
उशिरा येणारा पाऊस (Heavy rain) तसाच उशीरापर्यन्त साथ देईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली असली तरी, उशिरा सुरु झालेल्या खरीपाच्या हंगामा दरम्यान कामगार , रासायनिक खत , बिजाई यांच्या वाढलेल्या किमती, यामुळे यंदा धनपिक रोवनी पेक्षा आवत्याला अधिक भर दिले जात आहे. त्यामुळे पावसाची आणि समोर निर्माण होनाऱ्या दुष्काळाची कोणतीही पर्वा न करता शेतकरी राजा धानपिक पेरणीच्या कामाला लागला आहे. उन्हाला संपुन लागलेला पावसाळा (Heavy rain) आणि त्यामधे सुरु होणारा ख़रीपाचा हंगाम पावसा अभावी पुढे गेल्याने आणि रोहिणी पाठोपाठ लगलेले मृग नक्षत्र सबंध कोरडे जात असल्याने, आता नुकतेच मोराचे वाहन घेऊन लागनाऱ्या आद्रा नक्षत्राकडून दमदार पावसाची अपेक्षा शेतकरी राजा करत आहे.