आपत्ती व्यवस्थापनाचे पथक काही केल्या आलेच नाही!
निटूर (Manjra River Body) : निलंगा तालुक्यातील शेंद गावचे रहिवासी असलेले शेतकरी ख्वाजा इस्माईल पठाण (वय 35) या शेतकऱ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी मांजरा नदीपात्रात तरंगताना नातेवाईक व ग्रामस्थांना दिसून आला. काल दिवसभर आपत्कालीन व्यवस्थापन टीम येण्याला मुहूर्त लागला नसल्याने शोध कार्य झालेच नव्हते. मात्र काल बुडालेल्या शेतकऱ्याचा (Manjra River Body) मृतदेह आज पाण्यावर तरंगताना दिसून आला.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हालकी बाजुच्या (Manjra River Body) मांजरा नदीपात्रात सोमवारी शेतकरी पडल्याचे समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. पण त्यांना नदीपात्रावर काहीही आढळून आले नाही. शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तात्काळ शेंद गावचे तलाठी वैजनाथ चव्हाण तसेच हलकीचे तलाठी गंगाधर केदासे, पोलीस स्टेशनचे बीट जमादार राजेंद्र कांबळे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक कोळी बांधवांनी नदीपात्रामध्ये चार-पाच तास शोधा शोध करूनही सदर इसमाचा पत्ता लागला नाही.
शिरूर अनंतपाळ तहसीलदार गोविंद पेदेवाड यांच्याशी संपर्क साधून उदगीर येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क केला असता उशिरा पथक दाखल होईल किंवा सकाळीच पोहचेल, असे सांगीतले होते. मात्र आपत्ती व्यवस्थापन पथक काही आलेच नाही.
दरम्यान स्थानिक शेतकरी व नातेवाईक यांना आज सकाळी ठीक 8 वाजता नदीपात्रावर (Manjra River Body) मृतदेह तरंगताना दिसून आला. स्थानिकांच्या मदतीने प्रेत काठावर आणून शिवविच्छेदनासाठी शिरूर अनंतपाळ येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अकस्मात मृत्यूची नोंद करून बीट जमादार राजेंद्र कांबळे हे पुढील तपास करत आहेत.