शेतकरी कर्मचाऱ्यांच्या लढ्यात करुणा मुंडे यांची उडी!
रेणापूर (Farmers Aandolan) : तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स ली. पानगाव हा कारखाना विमल अँग्रो ली. ने विकत घेतला आहे. परंतु शेतकर्यांचे शेअर्स बुडीत निघाल्यामुळे ते कायम करावेत, कारखाना कर्मचाऱ्यांचे (Employees) थकीत वेतन देण्यात यावे, तोडणी वाहतुक ठेकेदार व थकीत ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता.9) पानगाव रेणापूर महामार्गावर पन्नगेश्वर कारखान्यासमोर दुपारी 2 ते 4.30 पर्यंत अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यास कर्मचारी यानी पाठिंबा दिला यामुळे जोरदार घोषणाबाजी सुरु असतानाच स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक करूणा मुंडे यांनी रास्ता रोको आंदोलनात (Rasta Roko Aandolan) सहभाग घेत सर्वांचे पैसे मिळेपर्यंत कारखाना सुरु होऊ देणार नसल्याचे सांगत प्रसंगी कर्मचारी व शेतकऱ्यांना (Farmers) सोबत घेत विधान भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा मुंडे यांनी दिला.
पानगांव व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत…
पानगांव व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत या उद्देशाने कै. गोपीनाथ मुंडे यांनी पानगांव ता.रेणापूर येथे 25 वर्षापुर्वी पन्नगेश्वर साखर कारखाण्याची (Panngeshwar Sugar Factory) उभारणी केली. या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवीत कारखान्यासाठी जमिनी कवडीमोल किमंतीत दिल्या होत्या. कै. मुंडे असे पर्यंत, कारखाना व्यवस्थीत चालला. परंतु, त्यांच्या पश्चात या कारखाण्याला घरघर लागली आणि शेवटी तो आज दोन वर्षा पासुन बंद अवस्थेत आहे.आणि शेवटी अंबाजोगाई येथील विमल ॲॅग्रो लि. कंपनीला विकुन टाकला. विमल ॲॅग्रो लि. कंपनीने कारखाना विकत घेतल्याने कारखाण्याचा ताबा घेतला परंतु शेतकरी सभासदांचे शेअर्स बुडीत निघाल्याने कर्मचाऱ्यांचे पीएफ, ग्रॅज्युटी व पगार थकीत राहिल्यामुळे तो देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला.
शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित!
यात करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) यांची उपस्थिती लाभताच आंदोलन शेतकरी व कर्मचाऱ्यात उत्साह वाढला. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या माझी सासरे कै. गोपीनाथराव मुंडे यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी कारखान्याची उभारणी केली. त्यांच्या पश्चात नेतृत्व करणाऱ्यांनी वैद्यनाथ व पनगेश्वर या कारखान्याची केलेली अवस्था पाहून अति दुःख होते. या कारखान्याच्या सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. असा इशारा देत प्रसंगी सभासद व कर्मचाऱ्यांना घेऊन विधान भवन व मंत्री पंकजा मुंडे यांच्या शासकीय बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा करुणा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला. याप्रसंगी मागण्याचे निवेदन कारखान्याचे सरखवस्थापक व्यंकट वाकडे यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालीदास आपेट, जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, दत्ता शिंगडे यांच्यासह शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.