गोंदिया (Gondia):- अपुर्ण पुल बांधकामाचा फटका शेतकरी-शेतमजुरांना, ये-जा करण्यासाठीं करावा लागतोय जीवघेणा प्रवास, केशोरी-चिचोली या दोन गावांना जोडणारा पुल (bridge) अपूर्ण, पर्याय रस्ता ही पाण्याखाली, शेतकऱ्यांसह सामान्य व विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
मागील दोन महिन्यापासून पुलाचा बांधकाम सुरु
गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी आणि चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या नाल्यावर मागील दोन महिन्यापासून पुलाचा बांधकाम (Construction) सुरु आहे. यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता असुन आता पावसाळा(rainy season) सुरू झाल्याने केशोरी व परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने पर्यायी रस्ता पाण्या खाली गेल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पुलाचा बांधकाम अपूर्ण असल्याने शेतमजुरांना, गावातील लोकांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करत मुठीत जीव घेऊन ये-जा करावे लागत आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र धान पिकाची रोवणी सुरू आहे. यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात शेतमजूर मजुरीच्या कामासाठी, विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जात असतात. अशातच केशोरी व चिचोली या दोन गावांना जोडणारा पूल अपूर्ण असल्याने याचा फटका शेतमजुरांना, सामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना बसत आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे शेती शुद्धा पाण्याखाली गेली असुन भातपिक खरडुन जाण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाहातून प्रवास करताना कुठलाही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण ? असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.