माजी जि. प. सदस्य किरण कांबळे यांचा ठिय्या आंदोलन
मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना दिला निवेदन
अर्जुनी मोर (Farmers Andolan) : गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली यामुळे अर्जुनी/मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानपिकाचे नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साचले आहे. (Farmers Andolan) शेतकऱ्यांनी लावलेले धान पीक मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान ची भरपाई देण्यात यावी या साठीच माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे यांनी अर्जुनी/मोरगाव शहर या ठिकाणी ठिय्या आंदोलन (Farmers Andolan) करण्यात आले.
आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभागी
यावेळी आंदोलनात (Farmers Andolan) मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. मुख्यमंत्री यांच्या नावाने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. तर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा मोठा आंदोलन व रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळेस माजी जि प सदस्या किरण कांबळे यांनी दिला आहे.