माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संस्थेवर विविध आरोप
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (farmers Andolan) : जगाचा अन्नदाता असलेला कष्टकरी बळीराजाचा उपयोग केवळ स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. करतात असा आरोप करीत पवन डुकरे, अमोल डुकरे व संतोष काळे या शेतकरी पुत्र्यांनी सावरगाव डुकरे येथेच २३ सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलनाला (Farmer Andolan) सुरुवात केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर आरोप. करित त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील कारभाराची चौकशी करून योग्य त्या कारवाईची मागणीसाठी शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलनाला दि. २३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे सुरुवात केली आहे.
स्वतःचे पाण्याला लागलेले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे हे सातत्याने भोळ्या भाबड्या शेतकऱ्याचा वापर आजवर करत आले आहेत. आता देखील विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याचे पाहून (Farmer Andolan) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या व ग्रामीण भागात सामाजिक सौहार्द प्रस्थापित करणाऱ्या शेत रस्त्यांच्या निर्मितीबाबत खोटेनाटे आरोप करून राजकीय स्वार्थापोटी विरोध करणाऱ्या, शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवत मोर्चा काढणे, मुख्यमंत्र्यांना रक्ताचे पत्र लिहून राजकीय स्टंटबाजी करणे असे प्रयोग त्यांनी केले.
मात्र हे सर्व प्रयोग फसल्याचे पाहून निराशेपोटी बोंद्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अन्यत्याग आंदोलनाचे नाटक सुरू केले आहे. असा सणसणाटी आरोप अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या या तीन शेतकऱ्यांनी केला आहे आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या या शेतकरी विरोधी कृत्यावरचा पडदा हटवून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या घेऊन आपण या (Farmer Andolan) आंदोलनात उतरलो आहे अशी प्रतिक्रिया पवन डुकरे, अमोल डुकरे व संतोष काळे यांनी बोलून दाखविल आहे.
ह्या आहेत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे थकीत असलेले ९४ कोटी रुपयांचे कर्ज राहुल बोंद्रे यांनी तात्काळ भरावे, राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये स्वतःच्या अनुराधा अर्बन बँकेच्या माध्यमातून राहुल बोंद्रे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी आणि परमहंस रामकृष्ण मोनीबाबा शिक्षण संस्था व मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीच्या स्थापनेसाठी भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा प्रमुख तीन मागण्या घेऊन पवन डुकरे, अमोल डुकरे आणि संतोष काळे यांनी हे (Farmer Andolan) अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.