हिंगोली (Farmers Andolan) : शेतकर्यांना दिवसा १० तास विद्युत पुरवठा देण्यासह शेतातील जळालेले रोहित्र ४८ तासात बदलुन देण्यात यावे. तसेच शेती पंपाना व गावठाण पुरवठा करणार्या विद्युत रोहित्राला फ्युज डब्बा तात्काळ बसविण्यात यावा यासह विविध १० मागण्यांसाठी १४ ऑक्टोंबर रोजी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर गुराढोराचे व उपोषण ठिय्या आंदोलन (Farmers Andolan) करण्यात आले. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी उपोषण कर्त्याची भेट घेवुन लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. परंतु लेखी आश्वासन देवुन आश्वसनाची पुर्तता केल्या जात नसल्याच्या आरोप उपोषणकर्ते व शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांनी केल्यानंतर संबंधित कर्मचार्यांवर कठोर कार्यवाही केली जाईल असे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिले आहे.
हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतकर्यांना ३३ केव्ही केंद्रावरून होणार विद्युत पुरवठा न सांगता ओव्हर लोडच्या नावाखाली अनेक वेळा बंद करण्यात आला. त्याची पुर्व सुचना न देता १२ तासात सुचना देण्यात यावी. तसेच या शेतकर्यांना रात्री ऐवजी दिवसा १० तास विद्युत पुरवठा देण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा ठिय्या आंदोलन व उपोषण करून ही फक्त लेखी आश्वासन दिल्या जात असल्याने उपोषण कर्ते डॉ. रमेश शिंदे यांच्यासह शेतकर्यांनी तात्काळ संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करून मागण्या पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. परंतु संबंधितावर कारवाई होत नसल्याने उपोषण कर्ते गुराढोराचे व ठिय्या आंदोलन ठाम असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिल्ह्यातील पहेणी व पांगरी यासह इतर ठिकाणी काही दिवसांपुर्वी रोहित्र जळाले होते. या संदर्भात लेखी आश्वासन देवुन ही रोहित्र उपलब्ध असताना अद्यापपर्यंत रोहित्राची जोडणी न केल्याने शेतकर्यांना सिंचनापासुुन वंचित राहावे लागत आहे.
यासह इतर मागण्यासाठी १४ ऑक्टोंबर पासुन हिंगोली येथील विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासामोर गुराढोराचे व (Farmers Andolan) आमरण ठिय्या आंदोलन सुरू आहे. अधिक्षक अभियंता चव्हाण, कार्यकारी अभियंता मुगारे व उपकार्यकारी अभियंता देशमुख यांनी लेखी आश्वासनासाठी व तात्काळ पुर्ततेकरीता चांगलीच धावपळ केल्याचे दिसुन आले. परंतु उपोषण कर्ते डॉ. रमेश शिंदे व शेतकर्यांनी ठिय्या आंदोलनावर ठाम असल्याचे डॉ. रमेश व शिंदे व शेतकर्यांनी सांगितले.