हिंगोली/गोरेगाव (Farmers Andolan) : हिंगोली जिल्ह्यातील अवयव विक्री करणार्या शेतकर्यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन यापुर्वी केलेले होते.परंतु उपमुख्य मंत्री अजित दादा पवार यांनी शेतकर्यांना हिंगोली जिल्हा हा दुष्काळ जिल्हा म्हणून जाहिर करावा तसेच अतिवृष्टीने भरडलेल्या शेतकर्यांना योग्य भाव देण्यात यावा. यासह इतर मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar) यांना मुंबई येथे दिल्यानंतर आणि कर्ज माफी करणार नाही असा पवित्रा घेतल्याने शेतकरी मंत्रालयावरच अर्ध नग्न आंदोलन केले जाणार असल्याचा निर्णय (Farmers Andola)n शेतकरी संंघटनेच्या पदाधिकार्यांनी घेतला आहे.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्यांचे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.त्या शेतकर्यांना पंचनामा न करता हेक्टरी ३० हजार रुपये मदत देण्यात यावी, पिक कर्जासाठी जिल्ह्यातील बॅका शेतकर्यांना सिबीलच्या अटी मुळे कर्ज दिल्या जात नाही, हे सर्व बॅकेवर गुन्हे नोंदवुन शेतकर्यांना पिककर्ज देण्यात यावे, सन २०२३ वरील खरीप व रब्बी पिकांचा पिकविमा नामंंजुर केलेल्या शेतकर्यांसहीत पात्र शेतकर्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी, सोयाबीनला खाजगी बाजारात ९ हजार रुपये भाव स्थिर राहण्याचे धोरण निश्चित राहावे. कापसाला खाजगी बाजारात १२ हजार रुपये देण्याचे धोरण अंमलात आणावे, (Farmers Andolan) शेतकर्यांना सरसकट कर्ज मुक्त करावे, जिल्ह्यातील संपुर्ण पंचायत समितीवर विशेषता सेनगाव पंचायत समितीवर कायम स्वरुपी गटविकास अधिकारी देण्यात यावा.
यासह इतर मागण्याचे निवेदन हिंगोली जिल्ह्यातील अवयव विक्री करणार्या शेतकर्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar), कृषी मंत्री धनंजय मुंढे, पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे ११ सप्टेंबर रोजी निवेदन दिले असून ह्या मागण्या मजुर कराव्यात अन्यथा हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी मंत्रालयावर अर्धनग्न दिंडी घेवुन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या सर्व शेतकर्यांना न्याय न दिल्यास आरबी समुद्र मुंबई येथे आत्मदहन करावे लागेल असे ही हिंगोली जिल्हा अवयव विक्री करणारे शेतकरी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दिनेश माहोरकर, सखाराम भाकरे, संतोष माहोरकर, दशरथ मुुळे आदींनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार कर्ज माफीचा निर्णय घेण्यास नकार; शेतकर्यांत तिव्र नाराजी
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षापासुन गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुुळे काही वेळ शेतकरी अतिवृष्टीने भरडले जात असूून काही वेळ पावसाच्या कालखंडाने नुकसान होत आहे. त्यातच सोयाबीन, कापुस, या पिकाला भाव नसल्याने व पिकविका मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्याच्या उबंरवठ्यावर उभा आहे. त्यामुळे यापुर्वी शासनाच्या विरोधात विविध आंदोलने करण्यात आली. परंतु शेतकर्याविषयी या सरकारमध्ये आस्ता नसल्याने (Farmers Andolan) शेतकर्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. परंतु कर्ज माफीचा निर्णय आम्ही घेवु शकत नाही असे अजित पवार यांनी सांगितल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देवुन आता मंत्रालयावरच अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.