दिवसाला आठ तास वीज द्या
अमरावती (Mahavitaran) : महावितरण कंपनीकडुन शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सकाळी व चार दिवस रात्री विद्युत पुरवठा करण्यात येतो.परंतु रात्रीचे सिंचन करणे अतिशय जोखमीचे असल्याने रात्री ऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. तिवसा – तालुक्यातील महावितरणचा ढेपाळलेला कारभार व महावितरण विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत आ. यशोमती ठाकुर (MLA Yashomati Thakur) यांनी गुरुवारी तहसिल कार्यालयातील सभागृहात (Mahavitaran) महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी आ. यशोमती ठाकुर (MLA Yashomati Thakur) सह महावितरण कंपनीचे (Mahavitaran) कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर, तिवसा येथील उपविभागीय अभियंता नितीन उईके, नगराध्यक्ष योगेश वानखडे, माजी नगराध्यक्ष तथा तालुका कार्यकारी अध्यक्ष वैभव वानखडे, माजी जि. प. सभापती दिलीप काळबांडे, पं. स. सभापती कल्पना दिवे, शिल्पाताई हांडे, सुरेशराव मेटकर, शरद वानखडे, चंद्रशेखर ठाकूर, विवेक देशमुख, मुकुंदपुनसे, मोहन वानखडे, दिनेश वानखडे, दीपक सावरकर आदी उपस्थित होते.
भारत ढोणे, रितेश पांडव, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने तसेच तालुक्यातील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आपापल्या गावातील (Mahavitaran) महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. तसेच तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, व महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्या पुढ्यात मांडल्या. त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून तालुक्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे अनिरुद्ध आलेगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.