मानोरा(Washim):- तालुक्यात सोयाबीनचा पेरा जास्त असुन सोयाबीनच्या मळणीला वेग आला आहे, मात्र सोयाबीनला (soybeans) बाजारात कवडीमोल भाव असल्याने कमी भावात सोयाबीन विक्री करून शेतकरी(Farmer) दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.
योग्य भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघेना
दिवाळी सण (Diwali festival) उत्सवात सण साजरा करण्यासाठी शेतकरी सोयाबीनची मळणी करून बाजारात विक्रीसाठी आनत आहे. एकरी एक बॅगेला उतारा ३ ते ४ क्विंटल येत आहे. दिवाळी तोंडावर आली असल्याने सोयाबीन बाजार पेठेत विक्रीसाठी शेतकरी घेऊन जातो तेंव्हा ३००० ते ३२०० रुपये क्विंटल पासून खरेदी केली जात आहे. हमी भावाच्या तुलनेत १२०० ते १३०० रुपये कमी दराने बाजार पेठेत सोयाबीन शेतकरी विक्री करीत आहे. त्यामुळे सोयाबीन हे हमी भावाने विक्री करण्याची सक्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यावर्षी सोयाबीन सोंगणीच्या कळातच परतीच्या पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांनी सोंगनी व मळणी केली. यामध्ये झालेला खर्च न परवडणारा आहे. त्यातही बाजारात पडलेले भाव शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.