अतिवृष्टी, कर्जाला कंटाळून टोकाचा निर्णय
परभणी (Farmers committed suicide) : अतिवृष्टी, पुरामुळे शेती पीक वाया गेल्यानंतर शेतकर्यांना आता मदतीची नितांत गरज आहे. माणसीक आधार देण्याची गरज आहे. खचलेला शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. परभणी जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार या दोन दिवसात तीन शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. (Farmers committed suicide) शेतकर्यांना वेळीच शासन स्तरावरुन मदत मिळणे गरजेचे झाले आहे.
बोरी पोलिस ठाणे हद्दीत सुकळी येथे एका महिला शेतकर्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली. प्रल्हाद नव्हाट यांनी खबर दिली आहे. दमावंती कैलास नव्हाट (वय ५० वर्ष, रा. सुकळी ता, जिंतूर) असे मयत महिलेचे नाव आहे. सततच्या नापिकीला कंटाळून तसेच बँकेतून घेतलेले कर्ज कसे फेडावे, त्यात पतीचे असलेले दिव्यांगत्व याला कंटाळून दमावंती नव्हाट यांनी विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली. बोरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर दुसरी घटना परभणी तालुक्यातील सनपुरी शेतशिवारात घडली. या ठिकाणी एका तरुण (Farmers committed suicide) शेतकर्याने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. प्रणीत सखाराम सुगंधे यांनी खबर दिली आहे. सतिश प्रणीत सुगंधे (वय २२ वर्ष) असे मयताचे नाव आहे. सतिश हा अतिवृष्टी, पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान आणि अलाहाबाद बँकेचे कर्ज कसे फेडावे या ताणतणावात ३ ऑक्टोबर रोजी शेतातील बांधावर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना दुपारी ४.३० च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. गडदे करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे खरिपातील पीके खरडून गेले आहेत. हातातोंडाला आलेले पीक वाया गेल्याने शेतकर्यांची मोठी अडचण झाली आहे. सावकारी, बँकांचे कर्ज कसे फेडावे, दैनंदिन गरजा कशा पूर्ण कराव्यात या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले आहेत. आता तात्काळ शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. शेतकर्याला आर्थिक आणि मानसीक दृष्ट्या पुन्हा उभे करण्यासाठी शाश्वप उपाययोजना करणे आवश्यक आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्याने रेल्वेसमोर उडी घेत संपविले जीवन
पूर्णा : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्याने (Farmers committed suicide) रेल्वे समोर उडी घेत स्वत:चे जीवन संपविले. ही घटना पूर्णा -वसमत लोहमार्गावर मरसुळ येथे शनिवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. चांदु काशिराम शिंदे (वय ६५ वर्ष, रा. मरसुळ) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. अत्यल्प भूधारक शेतकरी असलेले चांदु शिंदे यांनी शनिवारी सकाळी शेताकडे जातो म्हणुन घर सोडले.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक वाया गेल्याने मागील काही दिवसापासून ते तणावाखाली होते. यातच रेल्वे समोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनि. सुशांत किनगे, पोलिस अंमलदार प्रभाकर कच्छवे, मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. अतिवृष्टीत सोयाबीन पिकाची पूर्णत: नासाडी झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकर्याने स्वत:चे जीवन संपविले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.


