तुमसर (MBBS) : आई -वडीलाची घरची, सर्व सामान्य जेमतेम, परिस्थिती, शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत पोटच्या मुलां-मुलीला शिक्षण शिकवत तालुक्यातील खापा येथिल सुकराम मोहतुरे या शेतकऱ्यांचे अस्मिता सुकराम मोहतुरे (Asmita Mohture) या मुलीने रशिया येथे नुकतेच एम. बी. बी. एस. (MBBS) वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर पदवी प्रदान करून समाजात व तालुक्यात आपले नाव लौकिक केले आहे.
खापा येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात झाला जन्म
मुला पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणी प्रमाणे सुकराम मोहतुरे यांनी आपल्या मुलीचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जि.प.प्राथमीक शाळेत पुर्ण केले. माध्यमीक व पदवी शिक्षण तुमसर येथीलमहाविद्यालय पुर्ण केले. पऱतू अस्मिता ला सुरुवाती पासुनच शिक्षणा विषयी जिद्द व चिकाटी होती. तिला डाॅक्टर बनायचे होते. पऱतु तिने घरच्या परिस्थितीला न डगमगात आपल्या शिक्षणाची संधी सोडली नाही.
अस्मीताने (Asmita Mohture) विज्ञान शाखेत पदवी प्रदान करून डाॅक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वयाच्या २४ व्या वर्षी आपले वैद्यकीय शिक्षण विदेशातील रशिया येथे घेण्याचं हट्ट आपल्या आई-वडीलां कडे केला. सर्व सामान्य कुटुंबातील तिच्या आई वडिलांनी तिचे वैद्यकीय शिक्षण (Medical education) पुर्ण करण्याचा चंग बाधला व परिस्थितीशी दोन हात करीत रशिया ला पाठविले त्यात अखेर अस्मिता ने आपल्या जिद्द, चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस हे वैद्यकीय शिक्षण (Medical education) पुर्ण करुन डाक्टर पदवी मिळविली असल्याने तिचे खापा येथिल नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एम बी बी एस (MBBS) वैद्यकीय शिक्षण रशिया येथुन पुर्ण करुन घरी परतल्यावर माजी आमदार चरण वाघमारे, वाणी पंतसंस्थेच्या अध्यक्षा विजयश्री वाघमारे, ललित शुक्ला,
माजी नगरसेवक राजू गायधने, इंजि पकंज राठोड, नावेद शेख, बालचंद बोंदरे जयेश मोहतुरे, अरविंद मोहतुरे, बालचंद भोयर मंगल मोहतुरे, विकास मोहतुरे , आदींनी शाल श्रीफळ देऊन डॉ. अस्मिता मोहतुरे हीचा सत्कार केला.