महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना
– सुधीर गोगटे
हिंगोली (Farmers Debt Relief Yojana) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत (Farmers Debt Relief Yojana) प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतक- यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे अशा ११८३६ शेतक-यांच्या बँक खात्यावर रु. ४६७० लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ८२९ शेतक-यांना रु. ३५२ लाख, जळगांव जिल्ह्यातील ७२९ शेतकर्यांना रु. ३०७ लाख, नाशिक जिल्हयातील ७१३ शेतक-यांना रु. ३५४ लाख रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.
या प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत ३३३५६ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे शासनाच्या माहे ऑगस्ट २०२४ मध्ये निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतक-यांना रुपये ५० हजारा पर्यतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतक-यांना आधार प्रमाणीकरणाची संधी दि. १२ ऑगस्ट २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत देण्यात आली होती. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या ११८३६ शेतक-यांच्या बँक खात्यात रु. ४६.७० कोटीची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्ग करण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मयत झाले आहेत.
अशा शेतक-यांच्या वारसांची नांवे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व (Farmers Debt Relief Yojana) योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षामध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेली आहे अशा एकूण १४.५० लाख शेतकर्यांना आजपर्यंत एकूण रु. ५३१० कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.
जिल्हा निहाय शेतकरी संख्या व रक्कम पुढील प्रमाणे
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत (Farmers Debt Relief Yojana) जिल्हा शेतकरी संख्या व कंसात रक्कम लाखामध्ये-छत्रपती संभाजीनगर ३५३ (१७५.००), जालना ३५१ (७९.००), परभणी ११८ (३३.००), हिंगोली १०५ (२५.००), लातूर ५४९(१५५.००), धाराशिव ३८२ (१०४.००), बीड २५६ (९३.००), नांदेड ४५८ (१४८.००), अमरावती ५५३ (२६२.००), अकोला ३७४ (१७२.००), वाशिम १८४ (८३.४७), बुलडाणा १८३ (८६.००), यवतमाळ ८२९ (३५२.००), नागपूर ४८२ (२२९.००), वर्धा ३८० (१८६.००), चंद्रपूर ४१५ (१६७.००), भंडारा २४३ (९४.००), गडचिरोली १२३ (४८.००), गोंदिया २४७ (८८.००), ठाणे १४ (६.५६), पालघर १० (३.९३), रायगड १०६ (४२.९५), रत्नागिरी ५०३ (१३३.००), सिंधूदुर्ग १६२ (५७.८६), नाशिक ६१३ (३५४.००), धुळे १४० (६८.००), नंदूरबार १३८ (६८.००), जळगाव ७२९ (३०७.००), अहमदनगर ३७३ (२६३.००), पुणे ४५४ (२१३.००), सोलापूर ३०९ (१५१.००), कोल्हापूर ३३८ (१४३.००), सांगली २५६ (११७.००), सातारा ४२५ (१६२.००) अशा ३४ जिल्ह्यातील ११८३६ शेतकर्यांना रू.४६६९.७७ लाख रूपयाचा लाभ मिळाला आहे.