परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना
परभणी/जिंतूर (Electric shock) : तहान लागली म्हणून विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या (Jintur farmer) शेतकऱ्याचा शेतात पडलेल्या विद्युत तारेस स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि 12 जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोरगळवाडी शिवारात घडली. माहितीनुसार, कावी येथील शेतकरी संपत अच्युतराव लिपणे वय 40 वर्ष यांचे बोरगळवाडी शिवारात गट न 21 मध्ये शेत जमीन आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पेरणी योग्य ओआस झाल्याने ते कुटूंबिया सोबत सरकी लावण्यासाठी बुधवारी सकाळीच शेतात गेले होते. त्यांच्या शेतात विहिरीजवळ खंबावरील (Electric shock) विद्युत वाहक तार दोन दिवसांपासून तुटून पडलेले होते.
विद्युत शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यु
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जेवण करायचे म्हणून संपत लिपणे, हे विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांना खाबावरील (Electric shock) तार तुटून पडलेली दिसली. त्यांनी हाताने तार बाजूला करण्याचा प्रयत्न करतात जोरदार शॉक लागून ते जागीच मृत्यू पावले. ब्राचाह वेळ झाल्यावरही पाणी आणण्यासाठी गेलेले संपत लिपणे का आले नाही, म्हणून कुटूंबियांना विहिरीकडे धाव घेतली. हा प्रकार उघडकीस आला. याबाबत (Jintur Police) बामणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे