शेतकर्यांना डिजिटल सेवाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ जलदगतीने मिळावा
या हेतूने केंद्र सरकारने सुरु केलेल्या अॅग्र्रीस्टॅक योजनेला जिल्ह्यात सुरुवात होणार
परभणी (Parbhani Agristack) : कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलदगतीने व परिणामकारकरित्या देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची (Parbhani Agristack) अॅग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात १६ डिसेंबरपासून प्रत्येक गावात सर्व शेतकर्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याकरीता मोहीम राबविण्यात येणार आहे. ओळख क्रमांक मिळाल्यानंतर शेतकर्यांना तात्काळ कृषी योजनांचा लाभ मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या (Parbhani Agristack) अॅग्रिस्टॅक योजनेत मुख्य उद्देश राज्यातील सर्व शेतकर्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), तयार करणे, हंगामी पिकांचा माहिती संच, शेतांचे भू संदर्भिकृत माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे, राज्यातील शेतकर्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ शेतकर्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे. उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे. शेतकर्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण तसेच राज्यातील शेतकर्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषि व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी अॅग्रीस्टेक योजना सुरु करण्यात आली आहे.
शेतकरी ओळख पत्रामुळे मिळणारे फायदे
पीएम किसान योजनेतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. पीएम किसान योजनेतंर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल. शेतकर्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इनप्रâास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता राहील. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकर्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकर्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकर्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.
विविध योजनांचा जलदगतीने मिळणार लाभ
परभणी जिल्हयातील प्रत्येक गावात सर्व शेतकर्यांचे ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करणेसाठी सोमवार १६ डिसेबरपासून मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींने सदर मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा.
– रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी, परभणी