विमा कंपनीच्या प्रतिनिधींना धरले धारेवर
मानोरा (Farmers Insurance company) : मतदार संघातील मानोरा येथे दि. ७ ऑगस्ट रोजी बुधवारी दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव भाजपाचे युवा नेते ऍड. ज्ञायक पाटणी (Adv. Gnyak Patni) आले असता अनेक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेवून सन २०२२ – २३ चा पिक विमा खात्यात जमा झाल्या नसल्याची तक्रारी मांडल्या. त्यांनी विमा कंपनीचे कार्यालय गाठून (Insurance company) विमा प्रतिनिधींना धारेवर धरत पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कळवीत थेट जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस *Collector Buvaneshwari S( याच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत शेतकऱ्यांची तक्रारी सोडविणे संदर्भात संवाद साधला.
जिल्हाधिकारी याच्याशी साधला संवाद
यावेळी जिल्हाधिकारी यांनी येत्या १२ ऑगस्ट रोजी (Insurance company) विमा कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेवून पिक विमा बाबत आढावा घेणार असल्याचे आश्वासन भाजपाचे ऍड. पाटणी (Adv. Gnyak Patni) यांना दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, व. ना. तांडा सुधार योजनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड, तालुका सरचिटणीस डॉ. अविनाश लोथे, भाजपा पदाधिकारी मुकेश चव्हाण, विजय चव्हाण आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.