१५ ऑगस्टपर्यंत डीबीटी प्रणाली द्वारे होणार खात्यात जमा: आ. कुटे
बुलढाणा (Kharip crop insurance) : खरीप हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकुण २ लाख ३७ हजार १९९ शेतकरी बांधवांना (Kharip crop insurance) पीकविमा नुकसान भरपाई म्हणून १४३.७५ कोटी रुपये इतकी भरघोस रक्कम मंजुर झालेली आहे, त्यापैकी ९२,२८३ शेतकरी बांधवांना ८७ कोटी ८५ लक्ष इतकी नुकसान भरपाई रक्कम थेट DBT प्रणालीद्वारे शनिवार दि. ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत वितरीत करण्यात आली असल्याची माहिती आ.डॉ.संजय कुटे (Dr. Sanjay Kute) यांनी दिली असून १ लाख ४३ हजार ९१६ शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई म्हणून ५५ कोटी ९० लाख इतकी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून १५ ऑगस्ट पर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात DBT प्रणालीद्वारे नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे, असेही आ. कुटे यांनी सांगितले.
यासंदर्भात आ. संजय कुटे (Dr. Sanjay Kute) यांच्याकडून प्राप्त प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगामा बरोबरच रब्बी हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत एकुण ६४ हजार ३६७ शेतकऱ्यांना १३२ कोटी ७५ लक्ष इतकी नुकसान भरपाई मंजुर असून त्यापैकी ९ हजार २६२ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत देण्यात आलेली आहे व उर्वरित ५५ हजार ८५ शेतकरी बांधवांना ११९ कोटी ८१ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होईल यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मृगबहार हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (Kharip crop insurance) खरीप हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत मतदारसंघातील एकुण १४१४ शेतकऱ्यांना रुपये ६.४७ कोटी इतकी नुकसान भरपाई रक्कम मंजुर झालेली असून त्यापैकी १३५९ शेतकऱ्यांना ६.३० कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे आणि उर्वरित ५५ शेतकऱ्यांना रक्कम १७ लक्ष रुपये त्रुटी पूर्ततेनंतर वितरीत करण्यात येणार आहे. आंबिया बहार हवामानावर आधारित फळपिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत मतदारसंघातील एकुण ४७५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून त्यांना नुकसान भरपाईपोटी मदत मिळणेसाठी पीकविमा कंपनी स्तरावर जोरकष प्रयत्न सुरु आहेत.
यासोबतच सन २०२३-२४ मध्ये जुलै महिन्यात जळगाव जामोद मतदार संघात ढगफुटी सदृश पाउस पडून अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतीक्षेत्रसुद्धा खरडून गेले होते, अश्यावेळी खरडून गेलेल्या शेतीसाठी किंवा शेतीपिकाचे नुकसान यापैकी एकाच बाबीकरिता आर्थिक मदत मिळत होती परंतु शासनाकडे सतत पाठपुरावा करून खरडून गेलेली शेती व शेती पिकांचे नुकसान यासाठी शेतकरी बांधवांना मदत मिळावी याकरिता राज्य शासनाकडून ऐतिहासिक शासन निर्णय निर्गमित करून घेतला असल्याचे प्रतिपादन आ. डॉ.कुटे (Dr. Sanjay Kute) यांनी यावेळी केले.
यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील २९ हजार ८६७ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल २८ कोटी ९६ लाख इतकी रक्कम जमा करण्यात आली असून अपात्र १ हजार ४०० शेतकरी बांधवांकडून तृटी पूर्तता करून घेण्याचे काम सुरु आहे, सदर त्रुटी पूर्तता होताच त्यांच्याही खात्यात मदतीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. तसेच जळगाव जामोद तालुक्यातील २४ हजार १३१ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल ३२ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली. अपात्र ७६८ शेतकरी बांधवांकडून तृटी पूर्तता करून घेण्याचे काम सुरु आहे, सदर त्रुटीची पूर्तता होताच त्यांच्याही खात्यात मदतीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत.
जुलै अतिवृष्टीची मदत मिळाली नसल्याची जी ओरड आंदोलनकर्ते व राजकीय विरोधक सातत्याने करून शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत त्यात कुठलेही तथ्य नसल्याचे या आकडेवारी नुसार निदर्शनास येते. (Kharip crop insurance) शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर मी संवेदनशील असून त्यांचे हे प्रश्न शासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्याकरिता सतत पाठपुरावा करीत असतो. त्यामुळे मतदारसंघातील जनता सुज्ञ असून त्यांनी विरोधकांच्या या खोट्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन या निमित्ताने आ. डॉ.संजय कुटे (Dr. Sanjay Kute) यांनी केले.