किसान ब्रिगेडचा अभिनव उपक्रम
मोहाडी (Farmers loan waiver) : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांनी शेतीच्या कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले. पण दुष्काळ व नापिकी तसेच उत्पादनात घट या कारणामुळे कर्जाची (Farmers loan waiver) किस्त भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हातात पैसा नसल्यामुळे पैसा कसा भरावा, या विवंचनेत शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन तहसील कार्यालय मोहाडी येथील तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री यांना (Kisan Brigade) किसान बिग्रेड संघटनेतर्फे दि.१४ मे २०२५ रोजी देण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील शेतकर्यांचा कर्ज माफीसाठी शेतकरी नेते व (Kisan Brigade) किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांच्यावतीने शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी उपक्रम राबविण्यात आले आहे. शेतकर्यांनी रब्बी व खरीप हंगामातील कृतीकार्य धरणासाठी विविध बँकेकडून कर्ज आहेत. पण पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही. उत्पादनात कमालीचा घट या वर्षी आला आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले. कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले. कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांनी उत्पादन चांगला होईल या आशेवर बँकेकडून कर्ज घेतले. पण दुष्काळामुळे झालेली नापिकी तसेच वातावरणाच्या लहरीमुळे अतिवृष्टी, काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकर्यांच्या (Farmers loan waiver) शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच जिल्ह्यातील शेतकर्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची किस्त भरावयाची कशी, असा प्रश्न पडला आहे. एकीकडे दुष्काळ व नापिकीमुळे उत्पादनात झालेल्या घट व दुसरीकडे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, असा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. काही शेतकर्यांनी बँकेतून तर सावकाराकडून सुद्धा कर्ज घेतले आहे. त्यामुळे शेतकर्यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकर्यांनी किसान ब्रिगेड अंतर्गत तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी राधेश्याम गाढवे, गुरुदेव बोंदरे, जितेंद्र निंबार्ते, जितेंद्र लुटे, भिमराव बोरकर, शिवराम गाढवे, परसराम गाढवे, मुकेश गाढवे, सहादेव निंबार्ते, बान्ते, कुडलीक गाढवे, महेश बोंदरे, आशा गाढवे, प्रकिला गाढवे, माणीक गाढवे, दिनेश बोंदरे, फुलचंद धांडे, रविशंकर धांडे, ब्रिजलाल बान्ते, मयाराम बावणे, रोहित बान्ते, पारबता गाढवे, मोहपत सेलोकर, रुखमा सेलोकर, संजय सेलोकर, गिरमा सेलोकर, ताराचंद बान्ते, तानाबाई गाढवे, रामचंद ाढवे, रुपेश सिंदपुरे, देवराम सेलोकर, मनोहर निंबार्ते, राधेशाम बांते, संदिप गाढवे, गीता गाढवे, वैâलास बोंदरे, शोभा सेलोकर, सुधाकर बान्ते, देवांगणा बान्ते, अशोक ढबाले, फुलचंद धांडे, विश्वनाथ धांडे, सिंधू धाडे, शिवा सेलोकर, बाळकृष्ण सेलोकर, वनिता सेलोकर, पुरुषोत्तम बांते, मुरलीधर धांडे, मंगेश धांडे, तेजराम गोंधुळे, गजानन बांते, कवळू सेलोकर, कुंदा बोंदरे, अशोक कुकडे, शिवदास सेलोकर, यादोराव कानतोडे, सुरजलाल सेलोकर, विठाबाई बान्ते, रितेश कुकडे, आनंदराव बान्ते, अंकुश सेलोकर, केशव सेलोकर, अमन बोंदरे, अंकुश बोंदरे, भगवान गाढवे, झंझाड, केशव गायधने, लक्ष्मीकांत झोडे, गभने, विपुल गभने, गणेश मेहर, अर्जुन बोंदरे, हे उपस्थित होते.