मानोरा (Namo Shetkari Yojana) : महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर (Namo Shetkari Yojana) नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्य सरकारकडून एका वर्षात तीन हप्त्यात २ हजार रुपयाप्रमाणे ६हजार रुपये दिले जातात. नमो शेतकरी महासन्मान (Namo Shetkari Yojana) निधी योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ हप्त्यामध्ये १० हजार रुपये दिले आहे.
राज्यातील जवळपास ९१ लाख शेतकऱ्यांना (Namo Shetkari Yojana) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. एकीकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे २ हजार रुपये २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ३ हजार जागतिक महीला दिनापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे. (Namo Shetkari Yojana) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.