परभणी/सेलू (Parbhani):- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी (loan waiver) करावी, शेतीमाला योग्य भाव द्यावा. या प्रमुख मागणीसह गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रखडत पडलेली रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात शनिवार ६ रोजी शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.
मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
शहरातील अहिल्याबाई होळकर चौक परिसरातील लोकमान्य टिळक(Lokmanya Tilak) यांच्या पुतळ्यापासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. नूतन रोड, जिंतुर नाका मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता. या मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले.यावेळी साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमंतराव आडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अशोक काकडे, राजेंद्र लहाने, शिवसेनेचे राम पाटील, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, सुधाकर रोकडे,निर्मला लिपणे,गोरख भालेराव,प्रकाश मूळे,अँड.
आक्रोश मोर्चातील घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला
बालासाहेब रोडगे, रमेश डख, माकपचे रामेश्वर पौळ, दत्तूसिंग ठाकूर, माजीद बागवान, आप्पासाहेब रोडगे, मज्जीतभाई बागवान, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थिती होते. दरम्यान शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकरी कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करत आहेत. पीक विमा (Crop Insurance) भरून संबंधित कंपनी नुकसान भरपाई देत नाही, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, पीक चांगले आले तर वन्य प्राण्यांकडून (wild animals) नासाडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त आहे. सर्व महामंडळाना निधी उपलब्ध करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ आदी योजनांची प्रकरणे मंजूर करावीत आदी मागण्यासाठी या आक्रोश मोर्चा काढून निवेदन तहसिलदार दिनेश झांपले यांच्या मार्फत शासनास देण्यात आले. शहरात आज आठवडी बाजार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या या आक्रोश मोर्चातील घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.