लातुरात कृषी उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लातूर (Farmers organization) : गतवर्षीच्या ठिबक व तुषार सिंचन संच खरेदीचे अनुदान व गतवर्षीचा खरीप पीकविमा (Kharif crop insurance) तात्काळ द्यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी हलगी वाजवत लातूरच्या कृषी उपसंचालक कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करीत धरणे आंदोलन (Dharna Andolan) केले. कृषी विभाग (Agriculture Department) व पीकविमा (Kharif crop insurance) कंपनीने मिलीभगत करुन शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवले, असा आरोप यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला. यावेळी उपसंचालकांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निवेदन देण्यात आले.
2023-24 या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संच खरेदी केले. शासनाने अशा शेतकऱ्यांना अद्याप त्याची सबसिडी दिली नाही. तर 2024-25 ला तर मंजुरीच मिळाली नाही. याबाबत शेतकरी मात्र (Agriculture Department) कृषी विभागाकडे सतत चकरा मारत आहेत. हे संच शेतक-यांनी कर्ज काढून घेतले आहेत. त्यामुळे येणे असलेल्या 21 कोटी रु. चे व्याज हे शेतकऱ्याला भरावे लागत आहे, असा आरोप स्वाभिमानी (Farmers organization) शेतकरी संघटनेने केला.
तसेच गेल्या हंगामातील सोयाबीनचा (Kharif crop insurance) पीक विमा १०० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करावा; अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला. या (Dharna Andolan) आंदोलनात या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण दादा कुलकर्णी, लातूर उस्मानाबादचे संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे, नवनाथ शिंदे, राजू कसबे, हिराचंद जैन, दीपक कुलकर्णी, शिवदास पंचाक्षरी, किशन सांगावे, राम शिंदे, तानाजी भोपे, विकास राऊत, बालाजी पवार, दीपक आंबेकर, वैजनाथ माडजे, दत्ता ढोले, समाधान गीते, भैरोबा नाईकनवरे, रवींद्र शिंदे, सूरज तडोळे, दत्ता शेळके यांच्यासह अनेक शेतकरी या (Farmers organization) धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.