नवी दिल्ली (Farmers Protest News) : किमान आधारभूत किंमत (MSP) यासह आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सुमारे 17 शेतकरी जखमी झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे जाणारा पायी मोर्चा (Farmers Protest) पुढे ढकलला आहे.
वास्तविक, शनिवारी 14 डिसेंबर रोजी 101 शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेतकऱ्यांना शंभू सीमेपलीकडे जाता आले नाही. शंभू सीमेवरच पोलिसांनी 101 शेतकऱ्यांना अडवले. पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या या झटापटीत अनेक शेतकरी जखमी झाले. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना (Farmers Protest) माघार घ्यावी लागली.
#WATCH | Shambhu Border: Farmer leader Sarwan Singh Pandher says, "Indian government, the fifth largest economy in the world, used force against 101 farmers… Chemical water was thrown at us using cannons. Bombs were thrown at us. Tear gas shells were also thrown… 17 farmers… pic.twitter.com/VYQsIfOqQz
— ANI (@ANI) December 14, 2024
शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर (Sarvan Singh Pandher) म्हणाले की, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारत सरकारने 101 शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला. तोफांचा वापर करून आमच्यावर रासायनिक पाणी फेकण्यात आले. आमच्यावर बॉम्ब फेकले गेले… आमच्यावर अश्रूधुराचे गोळेही फेकले गेले. या (Farmers Protest) हाणामारीत 17 शेतकरी जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात योग्य उपचार केले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पंजाब सरकारला चांगले उपचार देण्यास सांगत आहोत. 16 डिसेंबरला पंजाब बाहेर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून 18 डिसेंबरला पंजाबमध्ये ‘रेल रोको’ची हाक दिली आहे.
“आम्ही सर्व पंजाबींना “रेल रोको” (Farmers Protest) मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. केवळ विधाने करून विरोधकांनी आपल्या भूमिकेपासून पळ काढू नये. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अजेंडा त्यांनी अधोरेखित करावा. इतर मुद्द्यांवर ज्याप्रमाणे संसद रोखत आहेत, त्याप्रमाणे आमच्या मुद्द्यावरूनही त्यांनी संसद थांबवावी”, असे शेतकरी नेते पंढेर (Sarvan Singh Pandher) म्हणाले.
एवढेच नाही तर 16 डिसेंबरला देशभरात ट्रॅक्टर मोर्चा (Farmers Protest) काढण्यात येईल आणि 18 डिसेंबरला पंजाबमध्ये गाड्या थांबवल्या जातील, अशी घोषणा पंढेर यांनी पुन्हा केली आहे.