पुसद (Pusad):- तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार(Adhaar) प्रमाणीकरण केले नाही. तेव्हा या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधून सदर प्रोत्साहन पर योजनेच्या लाभासाठी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सुनील भालेराव सहाय्यक निबंधक पुसद यांनी केले आहे.
महा-आयटी यांनी 12 ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध
महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyoti Rao Phule) शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहन पर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या ) परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी महा-आयटी यांनी 12 ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. याबाबत अप्पर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे पत्र 13 ऑगस्ट नुसार कळविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना बँकांमार्फत व्यक्तीशी कळविण्याबाबतच्या सूचना पत्रानुसार देण्यात आल्या आहेत. आधार प्रमाणीकरणाची सुविधा सीएससी (CSC)केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमध्ये पुसद तालुक्यातील 36 शेतकऱ्यांनी अध्याप पर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही. तेव्हा या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधावा सदर व लाभासाठी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.