तालुका कृषि अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांचे आवाहन
मानोरा (Crop Insurance) : यावर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी विमा कंपनी कडे तक्रार केली त्यांचे सर्व्हे विमा प्रतिनिधींकडून सुरू आहे. ज्या कास्तकाराचे सर्व्हे होत आहे. जर सर्व्हे करण्याचे विमा कंपनीचे (Crop Insurance) प्रतिनिधीने पैशाची मागणी केली तर त्यांना पैसे देवू नये , त्यांची तक्रार करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी केली आहे.
यावर्षी अतिवृष्टीने पिक नुकसानीची (Crop Insurance) विमा कंपनीकडे तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर जाऊन विमा प्रतिनिधीकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पिक नुकसानीची पंचनामा करण्याकरीता आलेल्या विमा कंपनीचे प्रतिनिधीकडून कोणतेही शुल्क /पैसे आकारले जात नाही. त्यामुळे आपण कोणत्याही अमिषाला बळी पडू नये जर आपणाला यासाठी पैशाची मागणी केल्यास आमचा ईमेल pikvima@aicofindia.com अथवा आमचा कंपनीच्या जिल्हा /तालुका स्तरीय प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या जिल्हा, तालुका कार्यालयाकडे तात्काळ तक्रार करावी.
तसेच (Crop Insurance) पीक नुकसानीची पंचनामा करण्याकरिता आलेल्या प्रतिनिधीकडे ओळखपत्र असल्याची खात्री करून घ्यावी प्रतिनिधीकडे ओळखपत्र असेल तरच त्याच्याकडून पंचनामा करून घ्यावा विना ओळखपत्र असलेला कोणीही व्यक्ती पंचनामा करण्याकरिता आल्यास तात्काळ कळवावे. असे तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश जैताडे, विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी विश्वनाथ काळे व प्रतिनिधी अर्जुन राठोड यांनी केले आहे.